अहमदपूरात वानरांचा हैदोस, वानरांच्या भितीने जनता भयभीत
अहमदपुर (गोविंद काळे) : अहमदपूर शहरात वाणराचा मोठ्या प्रमाणात वावर झाल्याने जनता भयभीत होऊन जिवण जगत असल्याने सदरील वाणराचा त्वरित बंदोबस्त करण्याची तहसीलदार यांना लेखी मागणी एका निवेदनाद्वारे शिष्टमंडळाने केली आहे.
अहमदपूर शहरातील अनेक भागात विशेषताहा लेक्चर काॅलणी, टेंभुर्णी रोड वरील गणेश नगर, सैनिक काॅलनी येथे सदरील अनेक वाणरे सकाळी व संध्याकाळी अनेकांच्या घराच्या संरक्षण भिंतीवर वावरत असतात घराचा दरवाजा उघडा दिसताच अचानक घरात प्रवेश करुन खाण्याच्या दिसेल त्या वस्तू बिनधास्त पणे घेऊन जात असतात.तेवढ्यात कोणी वानराला विरोध केला तर चक्क चवताळून अंगावर येत असल्याने मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुलांना तर जिव मुठीत धरून वावरावे लागत असल्याने स्थानिक नागरिक भयभीत झाले असल्याने याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन मनोहर पाटील, गोविंदराव गिरी,सौ.मिनाक्षीताई शिंगडे, आर.जी. कांबळे, प्रविण शिंगडे, यांनी अहमदपुर च्या तहसीलदारांना दिले आहे.
सदरील निवेदनावर डॉ.सतीष केंद्रे, शरद कांगणे, प्रा.अनिल मुंडे, शिवराज शेळके, राघवेंद्र गादेवार,बाशिदखाॅ पठाण, रवि महाजन, गोविंदराव गिरी, महेश लोहारे, शिवकुमार उडगे, आर.जी. कांबळे, सुप्रीय बनसोडे, रमेश कांबळे, सुजीत गायकवाड, पांडुरंग केंद्रे, गजानन नखाते, सिद्धेश्वर गुट्टे, अनुराधा केंद्रे, शिवगंगा गवळे, नितीन नारागुडे,जी.वाय.गायकवाड, वसंत तिडोळे,निरज लाटकर,जी.टी.घोगरे, शेकडे बी.डी.यांच्या सह शहरातील लेक्चर काॅलणी, गणेश नगर, सैनिक काॅलणी टेंभुर्णी रोड येथील अनेकांच्या स्वाक्षरी आहेत.