पशुधन पर्यवेक्षकांच्या मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे

पशुधन पर्यवेक्षकांच्या मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार - जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे

अहमदपूर (गोविंद काळे) : पशुसंवर्धन पर्यवेक्षकांनी विविध मागण्यां संदर्भात संपावर जाण्याचा निर्धार केल्याने आज अहमदपुर येथे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांची पशुसंवर्धन पर्यवेक्षकांनी भेट घेऊन रितसर निवेदन सादर केले असता राहुल केंद्रे यांनी सदरील संघटनेला पाठींबा दर्शवून सदरील मागण्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिले.
पुढे बोलताना राहुल केंद्रे म्हणाले की आपल्या लातूर जिल्हा परिषद स्तरावरच्या मागण्या येथेच सोडवू आणि राज्यातील विरोधी पक्ष म्हणून आपणास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी यावेळी दिले. आपल्या मागण्या न्याय्य असून मुंबई येथे पशुसंवर्धन मंत्र्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून अन्यायकारक निघालेला जीआर रद्द करण्यास भाग पाडले आहे. यापुढेही आम्ही आपल्या सोबत आहोत. तुमचा संबंध प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पशुधना सोबत येत असल्यामुळे जरी आपण संपात सहभागी झालात तरी पण शेतकऱ्यांच्या कठीण परिस्थिती मध्ये आपल्या कर्तव्याचा विसर न पडता त्यांना मदत होईल असेच आपण कार्य करत राहावे. जिल्हा परिषद प्रशासन म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत असेही शेवटी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले. यावेळी अहमदपुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, विस्तार अधिकारी धनाजी सुळे यांच्या सह पंचायत समितीचे पदाधिकारी व पशुधन पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author