गोसावी समाज बांधवांच्या वतीने गोविंद गिरी यांचा सत्कार संपन्न

गोसावी समाज बांधवांच्या वतीने गोविंद गिरी यांचा सत्कार संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : देश स्वातंत्र्य झाल्यापासून आजतागायत अहमदपुर शहरात गोसावी समाज बांधवांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नव्हती. सदरील समाज बांधवांच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावल्या बद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद गिरी यांचा गोसावी समाज बांधवांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. अहमदपूर शहरातील जाज्वल्य असलेल्या भगवान भारती मठ संस्थान मध्ये आयोजित सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शंभुदेव भारती हे होते. सत्काराला उत्तर देताना गोविंद गिरी म्हणाले की अहमदपुर शहरातील अनेक मयत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार हे सार्वजनिक स्मशानभूमीत नाविलाजाने दहण करावे लागले.समाजाच्या प्रथेप्रमाणे प्रेत दफन करण्याची परंपरा आहे.परंतू अहमदपुर शहरात स्वतंत्र दफनभूमी नसल्याने मोठी अडचण झाली होती.नगर परीषद व महसूल प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून लातूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गालगत अहमदपूर शहरात स्मशानभूमी मंजूर करून घेतल्याने
गेल्या अनेक वर्षांपासूनचा स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे यावेळी गोविंद गिरी यांनी सांगितले.यावेळी अहमदपुर पोलिस स्टेशनचे पोलीस जमादार भगवान गिरी याची उदगिर येथे बदली झाल्याने त्यांचा ही सत्कार समाजबांधवांच्या वतीने करण्यात आला. यावेळी मठाधिपती रमेश भारती, हणमंत गिरी, श्रीधर गिरी, बालाजी गिरी,शिवा भारती, भगवान गिरी, मुरलीधर भारती, ज्ञानगिर गिरी, बळी पुरी,सुमीर भारती, अतुल गिरी,सोनू गिरी, बालाजी बन, हणमंत गिरी, बाबुराव गिरी, सतिश पुरी, संजय पुरी अदि सह अहमदपुर शहरातील व तालुक्यातील गोसावी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author