विद्यार्थ्यांनी व्यवसायिक शिक्षणाकडे वळण्याची गरज – गणेश हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : आज आपल्या देशात एक हजारामागे एक तंत्रज्ञ आहे तर विकसनशील देशात 100 मागे एक तंत्रज्ञ आहे म्हणून देशाच्या विकासासाठी दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळण्याची गरज आहे असे मत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद माध्यमिक आश्रम शाळा वरवंटी ता. अहमदपूर येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी श्री हाके बोलत होते.
यावेळी भटक्या व विमुक्त जातीसाठी असलेल्या स्वामी विवेकानंद आश्रम शाळेत मधील विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा श्री हाके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन अनुक्रमे सचिन चव्हाण 92.80% प्रथम सलगर निकिता 90.80% घेऊन दुतीय तर राम डुबकवाड 90.60% घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे एकूण 59 विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी 90% पेक्षा अधिक गुण घेऊन 44 विद्यार्थी 75 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन 14 विद्यार्थी चा 60 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
अत्यंत गरीब कुटुंबातील व भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश नेत्रदिपक असून त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच असे मत भाजपाचे तालुका अध्यक्ष हनुमंत देवकते यावेळी मनोगत व्यक्त करताना मांडले.
या कौतुक समारंभ रुई चे सरपंच अशोक पाटील आयोजक परशुराम सुरनर पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक स्वामी सर यांनी केले तर सूत्रसंचालन सहशिक्षक तेलंग यांनी केले कार्यक्रमास शिक्षक ढेपे बी एम , केंद्रे एस जि., जाधव , कुलकर्णी,उपरवाड आदी कर्मचारी उपस्थित होते.