उदगीर तालुक्यात गोळीबार

 उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील नागलगाव येथील  शिवाजी ज्ञानोबा पाटील वय.62 रा.नागलगाव उदगीर यांने जमीनीच्या वादातून शेजारील शेतकरी रमेश गणपती गुडसुरे वय 35 व त्याचा भाऊ सतीश याचेवर आपल्या कडील रिव्हाँलवरने गोळीबार केला आहे. त्यात रमेश यास गोळी लागलेली असुन त्याची प्रक्रुती ठिक आहे. त्यास पुढील दवाउपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले आहे.

  यातील आरोपीत शिवाजी पाटील यास ताब्यात घेण्यात आले आहे.गावात शांतता असुन पोलीसांनी योग्य बंदोबस्त ठेवला आहे.या विषयाला धरून अनावश्यक अफवा पसरवू नये किंवा अफवावर विश्वास ठेवू नये.व्यक्तीगत पातळीवर वादातून ही घटना घडली आहे,परिस्थिती शांत आहे,असे पोलीस सुत्रांनी सांगीतले आहे.

About The Author

error: Content is protected !!