नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

लातूर : मांजरा धरणाचा पाणीसाठा 70 टक्के तर निम्न तेरणा धरणाचा पाणीसाठा 88 टक्के पर्यंत पोहोचला आहे. सध्या दोन्ही धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे दोन्ही धरणे भरण्याची शक्यता असून त्यानंतर धरणात येणारे पाणी नदीपात्रात सोडावे लागणार आहे. तरी मांजरा व तेरणा नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सर्वांनी सतर्क राहून विशेष खबरदारी घ्यावी. नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळा, आपल्या मालमत्तेची आणि जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन लातूर पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!