स्वातंत्र्यदिना निमित्त रक्तदान शिबिर व माजी विद्यार्थ्यांचा गौरव
उदगीर- (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 12 जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, उपप्राचार्य एस. जी. कोडचे, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे, प्रा. नीलकंठ वगशेट्टे, लेफ्टनंट कमांडर प्रा. डॉ. आर. पी. साबदे यांची उपस्थिती होती. सकाळी संस्थेचे पदाधिकारी व प्राचार्यांच्या हस्ते सी.ए. ईशा चिद्दरवार, शिवानंद रोडगे, शिवाजी केंद्रे, विशाल जाधव या माजी विद्यार्थ्यांचा ग्रंथ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नागनाथ खांडेकर यांनी केले.
