प्राचार्या अनुराधा गुरमे यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

0
प्राचार्या अनुराधा गुरमे यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर शहरातील राधेकृष्ण नगर, देगलूर रोड परीसरातील रेनबो पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ.अनुराधा विनोद गुरमे यांची महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक २०२५ च्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
हा पुरस्कार सोहळा ५ सप्टेबर २०२५ रोजी नांदेड येथील कुसुम सभाग्रहात संपन्न होनार आहे.
प्राचार्य अनुराधा गुरमे यांनी शैक्षणिक सामाजिक साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले विद्यार्थ्यांना अभ्यासाची रुची लागावी म्हणून त्यांनी विविध उपक्रमही राबवले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असलेल्या एक उपक्रमशील प्राचार्य असूनही एका शिक्षिकेची भूमिका महत्त्वाची समजून त्या भूमिकेतून विद्यार्थ्यांची जडणघडण घडावी यासाठी त्या प्रयत्न करतात. त्यांच्या एकूण कामकाजाचा लेखाजखा पाहून संयोजन समितीने त्यांची ही निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांच्या अभिनंदन आणि कौतुक होत आहे. प्राधान्याने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्या बद्दल पशुवैदकीय अधिकारी शिवाजी मानकोळे, सतिश पाटील मानकीकर,ज्ञानेश्वर बिरादार, विनोद गुरमे ,संजय कच्चे,प्रा.शाहुराज माने, हसन शेख,माधव केंद्रे ,संगमेश्वर शेरे मामा, महेश जगळपुरे,सौ.मिताली ढेगे,दिपाली परगे,वैष्णवी माने,पुनम हिरेमठ,पुजा हल्लाळे यांनी अभिनंदन केले आहे. तसेचं शैक्षणीक,सामाजीक स्तरातून अभिनंदन होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!