श्यामार्य कन्या विद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

0
श्यामार्य कन्या विद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

उदगीर (प्रतिनिधी) श्यामार्य कन्या विद्यालयात स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामार्य कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण भोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे सहसचिव अंजुमनीताई आर्य उपस्थित होते. मंचावर सेवानिवृत्त शिक्षक अजय श्रीवास्तव, ग्रंथपाल देवर्षे, पालक प्रतिनिधी शिवकुमार मलगे, पर्यवेक्षक विजय बेले, सेवाजेष्ठ शिक्षिका संगीता सुतार, वनमाला मुक्कावार उपस्थित होते. श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे सहसचिव अंजुमनीताई आर्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी भाषण व समूहगीत व समूहनृत्य सादर केले. ऑपरेशन सिंदूर वर आधारित विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद संगीत नृत्य सादर केले आणि खूप बक्षिसे प्राप्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी निडवंचे यांनी तर आभार मुख्याध्यापक प्रवीण भोळे यांनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!