कुटुंबव्यवस्थेत उत्तम संस्कार होतात – पो.नि. दिलीप गाडे

0
कुटुंबव्यवस्थेत उत्तम संस्कार होतात - पो.नि. दिलीप गाडे

उदगीर (ॲड. एल पी उगिले) एकविसाव्या शतकात कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. आजोबा, आजी, आई, वडील हे खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचे विद्यापीठ असतात. त्यामुळे त्यांच्या सहवासात राहणे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, काळाची गरज आहे. माणसावर उत्तम संस्कार आदर्श अशा कुटुंब व्यवस्थेतच होत असतात, असे विचार उदगीर शहर पोलीस निरीक्षक दिलीप तारामती दत्तात्रेय गाडे यांनी मांडले.
उदगीर येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या ८६ व्या स्मृतीनिमित्त आयोजित ९१ वा वचन सप्ताहाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून दिलीप गाडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव समाजाचे उपाध्यक्ष प्रमोद शेटकार होते. याप्रसंगी बसवपीठावर माजी आमदार प्रा. मनोहरराव पटवारी,
ॲड. बबिता संकाये, सुभाष धनुरे, उत्तरा कलबुर्गे, मुख्याध्यापक अंगद हक्के व एस.के. काळे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा बसवेश्वर व धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना पो.नि. गाडे यांनी सांगितले की, आपल्या कृतीमुळे एखाद्याला जर चांगली अनुभूती येत असेल, तर त्याला पुण्य म्हटले जाते. सर्वच धर्मामध्ये संतांनी आदर्श जीवन जगण्याचा संदेश दिलेला आहे. नैतिकता ही खऱ्या अर्थाने माणसाला चांगल्या प्रकारे बांधून ठेवत असते. राहणीमान साधं असलं तरी चालेल, परंतु विचार मात्र उच्च असले पाहिजेत. कारण अंगात कर्तुत्व असेल तर साधेपणा देखील उठून दिसत असतो. चांगले व्यसन माणसाला असलेच पाहिजेत, असे सांगत आपली जडणघडण प्रतिकूल परिस्थितीत कशी झाली ? यावर देखील त्यांनी विस्ताराने भाष्य केले.
यावेळी माजी आमदार प्रा. मनोहर पटवारी म्हणाले, महात्मा बसवेश्वर हे डाव्या विचाराचे व मानवतावादी होते. महात्मा बसवेश्वरांनी जाती व वर्ण व्यवस्था नाकारून त्या काळात फार मोठी क्रांती केली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन ॲड. महेश मळगे यांनी तर आभार गुरुप्रसाद पांढरे यांनी मानले.
कार्यक्रमास समाजबांधव, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र हसरगुंडे, ॲड. महेश मळगे, उत्तरा कलबुर्गे, शिवकुमार उप्परबावडे,
राजकुमार हुडगे, प्रभूराज कप्पिकेरे, आडेप्पा अंजुरे, महादेव हरकरे, ॲड. एस.टी. पाटील, ॲड. श्रीकांत बडीहवेली,बाबूराव हिप्पळगे, गुरुप्रसाद पांढरे, शिवराज पाटील, अनिल बागबंदे, सुशील पटवारी, सुरेश कुरुपखेळगे, गुंडप्पा समगे, सिद्राम शेटकार, राम मोतीपवळे, बाबुराव माशाळकर, मुख्याध्यापक अंगद हक्के, एस. के काळे, बी. व्ही. बिरादार, प्रा. म.ई. तंगावार, प्रा.डॉ. मल्लेश झुंगास्वामी, शांतवीर मुळे, मंगला आंबेसंगे, सुनीता तोंडारे, सतीश पाटील हैबतपुरकर, शिवशंकर मठपती, समर्थ लोणी, मधू उप्परबावडे आदींनी प्रयत्न केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!