एकंबेकर महाविद्यालयात पद्मश्री डॉ. एस.आर. रंगनाथन यांची 133 वी जयंती साजरी

0
एकंबेकर महाविद्यालयात पद्मश्री डॉ. एस.आर. रंगनाथन यांची 133 वी जयंती साजरी
 उदगीर (प्रतिनिधी) येथील कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात  ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस आर रंगनाथन यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली.   याप्रसंगी कै. बापूसाहेब एकंबेकर सेवाभावी संस्थेचे सचिव डॉक्टर विजयकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. डॉ.एस. आर. यांच्या जयंतीच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे तसेच सामूहिक वाचनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर विजयकुमार पाटील यांच्या हस्ते प्रत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी ग्रंथालय सल्लागार समितीचे सर्व सदस्य,  विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी सामूहिक वाचनाचा लाभ घेतला, प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. हिरा  मोरतळे यांनी केले तर आभार श्री जाधव दिलीप कुमार यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!