राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्राचे वाटप

0
राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्राचे वाटप

उदगीर (प्रतिनिधी)
राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या महाराष्ट्र पातळीवरील नेतेमंडळीच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र देऊन, सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्राधान्याने राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे राष्ट्रीय महामंत्री बालाजी नारायण सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव, प्रदेश महामंत्री किशोर लखन, प्रदेश महामंत्री अनंत चौधरी, लातूर जिल्हा महामंत्री देविदास मोहिते यांच्या उपस्थितीमध्ये प्रमाणपत्र व ओळखपत्राचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याचे आयोजक राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे प्रदेश संघटन महामंत्री डॉ. शरदकुमार तेलगाने हे होते. याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या कार्यप्रणालीची माहिती देऊन सामाजिक जाणीव विकसित करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक कामासोबतच सामाजिक काम म्हणून राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या ध्येय धोरणानुसार वेळ द्यावा, आणि सर्वसामान्य माणसापर्यंत राष्ट्रीय मोदी सेवा समितीची भूमिका मांडावी. अशी माहिती डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी दिली.
यावेळी विधी सेलचे प्रदेश अध्यक्ष निलेश हिपळगे, बिदर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरजीत आडे, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन काळगापुरे, देवणी तालुक्याचे अध्यक्ष साईनाथ निलावार, मुखेड तालुका अध्यक्ष शिक्षक आघाडीचे निलेश देवशेट्टे, तालुका ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष शंकर तेलंगपूरे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष भरत बिरादार, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दीपक बिरादार, तालुका उपाध्यक्ष हनुमंतराव देगलवाडे, देवणी तालुका उपाध्यक्ष परमेश्वर मोरे, धनाजी बिरादार तालुका अध्यक्ष कमालनगरचे सुनील म्हेत्रे, औराद तालुका अध्यक्ष लक्ष्मण राठोड ,प्रकाश आंबेसंगे अमरनाथ मुळे, उमाकांत द्द्याडे ,सुभाष शेरे, अशोक तोंडारे, कल्याण लाला, परमेश्वर पटवारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ. शरदकुमार तेलगणी यांनी केले तर आभार प्रदर्शन महारुद्र झेरकुंटे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!