लाल बहादुर शास्त्री विद्यालयात बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन……
उदगीर (ता.प्र) येथील महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या बालचित्रकला स्पर्धा 2025 या स्पर्धेचे आयोजन लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात करण्यात आले. शालेय जीवनात शासनस्तरावर होणारी एकमेव चित्रकला विषयासाठीची पहिली पायरी म्हणून बालचित्रकला स्पर्धेकडे पाहिले जाते.
बाल चित्रकला स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी चा एक गट व इयत्ता आठवी ते दहावीचा एक गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते.सदर दोन्ही गटात मिळून विद्यालयातून अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही स्पर्धा मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार व त्यांच्या उपस्थितीत पार पडली.
प्रश्नपत्रिकेत दिलेल्या तीन विषयांपैकी आवडत्या एका विषयावर चित्र रेखाटन करून आवडत्या रंग माध्यमात रंगकाम करण्याची मुभा प्रश्नपत्रिकेत दिली होती. सदरील स्पर्धा यशस्वीपणे राबविण्यासाठी स्पर्धा प्रमुख कलाशिक्षक गुरुदत्त महामुनी यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर, पर्यवेक्षक कृष्णा मारावार,किरण नेमकं,माधव मठवाले, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख अनिता यलमटे सहाय्यक निलेश मांडवकर आदींची याप्रसंगी उपस्थित होती.
