मानवेंद्रजी केंद्रे यांचा सत्कार

0
मानवेंद्रजी केंद्रे यांचा सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) जिजामाता बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ पाटोदा बु चे संस्थापक अध्यक्ष मानवेद्रेजी केंद्रे यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल उदगीर येथिल रुक्मीणी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा नाईक नगर अवलकोंडा रोड, उदगीर येथील कर्मचार्‍यांच्या वतीने सत्काराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरवात स्वागत गीताने झाली . या सोहळ्यासाठी उदगीर तहसीलचे तहसीलदार राम बोरगावकर , ग्रामिण पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक राजकूमार पुजारी, डाॅ माधव चंबुले, श्रीमती रूक्मिणीताई, डॉ भागवत केंद्रे, अमरभैय्या केंद्रे, मुख्याध्यापक व्यंकट मुंडे आदीच्या उपस्थित भव्य सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा २००३-०४ चा डाॅ बाबासाहेब आंबेडकर सामाजीक न्याय विभागाचा पुरस्कार , एम आयटी चा पुरस्कार यापूर्वी प्राप्त झाला आहे .मानवेंद्रे केंद्रे यांचे शैक्षणिक,सामाजिक ,सांस्कृतीक ,पर्यावरण आदी क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय आहे. या कार्याची दखल घेऊन ठाणे येथे वंजारी समाजाच्या वतीने समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सोहळ्यासाठी वीरेंद्र पाटील ,प्राचार्य डॉ कराड ,प्राचार्य जुकले, मुख्याध्यापक अनंत देशमुख, प्राचार्य सचिन घुमाडे, प्रा. अंकुश आदी उपस्थित होते . हा सत्काराचा सोहळा यशस्वी करण्यासाठी बालाजी गुट्टे , हाणमंत बळते, मनोज तेलंग, धम्मपाल वायगावे, l प्रविण कांबळे , अनंत दाडगे, धनाजी म्हेत्रे आदीने परिश्रम घेतले . सूत्रसंचालन व प्रस्ताविक प्रा डॉ विजयकुमार कल्लूरकर यांनी तर आभार धम्मपाल वायगाव यानी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!