सीमाभागातील दापका परिसरामध्ये नंदिबिजलगाव येथे ढगफुटी.

0
सीमाभागातील दापका परिसरामध्ये नंदिबिजलगाव येथे ढगफुटी.

उदगीर (प्रतिनिधी) सीमाभागातील कमलनगर तालुक्यामधील दापका परिसरामध्ये रविवारी संध्याकाळी ढगफुटीचा प्रकार घडलेला आहे. पाऊस सरासरी 309 मिलिमीटर इतका दापका परिसरात पडलेला आहे. भंडरकुंमठा, खेर्डा ,मुदखेड ,दापका, गंगनबिड, गणेशपुर ,चिखली या गावातून पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. नंदीबिलगाव या गावात शेकडो एकर जमीन वाहून गेलेली आहे. 50 पेक्षा जास्त जनावरे वाहून गेलेले आहेत .गावात पाणी शिरल्यामुळे अनेक घराची पडझड झालेली आहे. जनावराची जीवित हानी झाली आहे. शेळ्या, म्हैस,गाई, बैलं वाहून गेलेले आहेत. जिवीत हानी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. नंदीबिजलगाव या गावात अतोनात पिकाचे नुकसान, जमिनीचे वहन, खनन झालेली आहे. निसर्गाच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हा अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. पिक विमा कंपनी, कृषी अधिकारी, तालुका तहसीलदार, जिल्हा कलेक्टर यांनी गावांना भेटी दिलेले आहेत. त्वरित इथल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, व वाहतूक यंत्रणा विस्कळी झालेली आहे. या गावात लाईटची सुविधा नाही. मोबाईल नेटवर्क नाही. अशा अनेक संकटांना इथली जनता सामोरे जात आहे. प्राथमिक समस्याचे निराकरण प्रशासकीय यंत्रणेने करावा, अशी येथील नागरिकांमध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक शेतकरी दुःखाच्या छायेत पडलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना धैर्याने मदतीची गरज आहे. याकडे शासनाने व प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!