शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दिन’ साजरा​अहमदपूरमध्ये प्रा. गोविंदराव शेळके यांचे व्याख्यान

0
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी 'राष्ट्रीय वैज्ञानिक दिन' साजरा​अहमदपूरमध्ये प्रा. गोविंदराव शेळके यांचे व्याख्यान

​अहमदपूर (गोविंद काळे) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन २० ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दिन’ म्हणून देशभर साजरा केला जात आहे. या निमित्ताने, अहमदपूर येथे ‘दाभोलकर व वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
​हे व्याख्यान सामाजिक कार्यकर्ते प्रा. गोविंदराव शेळके सर देणार असून, ते २० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्याचे आवाहन अंनिसच्या वतीने सुजाण नागरिकांना करण्यात आले आहे.
​डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद समाजात रुजवण्यासाठी समर्पित केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून, त्यांच्या स्मृतिदिनी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अंनदश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!