मातृभूमीच्या रक्तदान शिबिरात 54 रक्तदात्यांनी केले रक्तदान(स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराची मातृभूमीची परंपरा)

0
मातृभूमीच्या रक्तदान शिबिरात 54 रक्तदात्यांनी केले रक्तदान(स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराची मातृभूमीची परंपरा)

उदगीर (प्रतिनिधी) येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मातृभूमी महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 54 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा कुलकर्णी, सुधीर पाटील, संजय राठोड, सतीश पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मागील चौदा वर्षापासून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मातृभूमी महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात येते. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा रणजीत मोरे, प्रा शितल पवार, प्रा शिवांगी वट्टमवार, काळे अस्विनी, प्रा काकरे प्रतीक्षा, ग्रंथपाल उषा सताळकर, रामकिशन भोसले, मादळे प्रदीप, दीपक रणदिवे, दयानंद टाके, विवेक देवर्षे, मयुर मुळे, संगीता दुडे, सय्यद सिमा, प्रकाश गायकवाड, जगदिशा ओंकारे ,मुबारक पटेल, अर्चना बिरादार यांच्यासह शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले. यावेळी मातृभूमी महाविद्यालय कस्तुराबाई नर्सिंग स्कूल व मातृभूमी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!