चंद्रकांत अण्णा वैजापुरे व बाळासाहेब बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

0
चंद्रकांत अण्णा वैजापुरे व बाळासाहेब बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

उदगीर (प्रतिनिधी)
जीवन प्रयाग फाऊंडेशन, उदगीर आयोजित स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापुरे व बाळासाहेब बिराजदार यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी ता. उदगीर येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक युसुफ पठाण होते. यावेळी मंचावर चंद्रकांत अण्णा वैजापूरे, बाळासाहेब बिराजदार, ॲड. राजू उस्तुरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शाळेचे सहशिक्षक विजयकुमार गबाळे यांनी मानले. यावेळी जीवन प्रयाग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी, क्षितिज जाधव व शाळेतील शिक्षक, कर्मचारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!