छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी
उदगीर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मांजरे आर.एम. होते. सर्वप्रथम राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य मांजरे यांनी राजीव गांधी यांच्यावर प्रकाश टाकताना म्हटले, त्यांचे व्यक्तिमत्व प्रसन्न होते.ते बुद्धिजीवी पंतप्रधान म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत शिक्षण,तंत्रज्ञान आणि सामाजिक ऐक्य यावर भर दिला. म्हणून हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. सद्भावना म्हणजे सौहार्दपूर्ण, सामंजस्यपूर्ण वातावरण. म्हणून असे कार्यक्रम सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी साजरे केले जातात .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.सुरेश शिंदे यांनी केले तर सहसंयोजक डॉ. डी.बी. मुळे यांनी शपथ देऊन आभार मानले. या कार्यक्रमाला प्रबंधक बी.के. पाटील, अधीक्षक व्हि.डी. गुरुनाळे, मुख्य लिपिक आर.एम. लाडके, प्राध्यापक, कार्यालयीन, कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने संपन्न करण्यात आला होता.
