अनधिकृत शेत रस्ता प्रकरणी तहसीलदारास शपथपत्र दाखल करण्याचे मा. उच्च न्यायालयाचे आदेश

0
अनधिकृत शेत रस्ता प्रकरणी तहसीलदारास शपथपत्र दाखल करण्याचे मा. उच्च न्यायालयाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर:

तुळजापूर तालुक्यातील मौजे तीर्थ खुर्द येथील प्रवीण कानडे व उमा कानडे यांच्या शेतातून मंडळं अधिकारी आणि तलाठी यांनी जेसीबीच्या साहाय्याने कोणताही लेखी आदेश नसताना १० फूटाचा रास्ता एक किलोमीटर पर्यंत काढल्याची गंभीर बाब मा.उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली असता. मा. उच्च न्यायालयाचे मा. न्या. रोहित जोशी यांनी तहसीलदार तुळजापूर यांना तहसीलदारांनी कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार हा रास्ता केला, याबाबत शपथपत्र दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

या संदर्भात प्रवीण कानडे यांनी अ‍ॅड. अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. दिनांक २४ जून २०२४ रोजी मंडळ अधिकाऱ्यांनी अर्जदारास चौकशी व मोक्याची पाहणीसाठी २९ जून रोजी हजर राहण्याचे पत्र दिले होते. मात्र, ठरलेल्या दिवशी अर्जदाराचे म्हणणे न ऐकता व तहसीलदारांचा कोणताही लेखी आदेश नसताना, शेतातून थेट जेसीबीच्या साहाय्याने रास्ता काढण्यात आला. नोटीस जाय मोका पाहणी ची असताना जे सी बी सोबत आणून याचिका कर्त्यास कोणतीही नैसर्गिक न्यायत्तावानुसार संधी न देता तात्काळ जे सी बी ने रस्ता तयार केला ही बाब न्यायालयात अ‍ॅड. अजिंक्य रेड्डी यांनी निदर्शनास आणून दिली त्यावर मा. न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत तहसीलदारांनी कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार हा रास्ता केला, याबाबत शपथपत्र दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले. सदर प्रकरणात अ‍ॅड. अजिंक्य रेड्डी यांनी युक्तिवाद सादर केला, तर अ‍ॅड. विष्णु कंदे यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!