श्यामार्य कन्या विद्यालयात श्याम क्रीडा पंधरवडा अंतर्गत विविध शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन
उदगीर ( प्रतिनिधी) श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणि आर्य यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडागुणांना वाव देण्यासाठी श्याम क्रीडा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.
या क्रीडा पंधरवडा अंतर्गत बुद्धिबळ, धावणे,कॅरम ,व्हॉलीबॉल ,क्रिकेट, लिंबू चमचा ,थैला रेस, विद्यार्थी-शिक्षक-पालक संगीत खुर्ची, कबड्डी, खो-खो, लंगडी, दोरीवरील उड्या, भालाफेक, गोळा फेक इत्यादी विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. खेळ खेळल्याने मानसिकता प्रबळ होते, आणि तणाव कमी होतो, ज्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते.
स्पर्धेतील जिंकण्या-हारण्याची वृत्ती स्वीकारायला शिकते, ज्यामुळे जीवनातील अडथळ्यांना तोंड देण्याची क्षमता वाढते. शाळांमध्ये खेळांना खूप महत्त्व आहे. ते शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक कार्य आणि शिस्तीला प्रोत्साहन देतात, आणि निरोगी स्पर्धेशी संबंधित मूल्ये रुजवतात. शारीरिक हालचालींमुळे संज्ञानात्मक कार्य वाढते, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शैक्षणिक कार्यक्षमतेत सुधारणा होते. क्रीडा स्पर्धांचे महत्त्व शारीरिक आरोग्य सुधारण्यासोबतच मानसिक विकास, चारित्र्य निर्मिती, सामाजिक कौशल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करण्यात आहे. क्रीडा स्पर्धांमुळे व्यक्तिमत्त्व घडते, संघभावना वाढते आणि निरोगी स्पर्धेची सवय लागते, ज्यामुळे जीवनातील आव्हाने स्वीकारण्याची क्षमता वाढते. त्यामुळे विद्यार्थी सर्वांगीण विकास होणे हेतू शामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुपोषपाणी आर्य, उपाध्यक्ष गिरीश मुंडकर , सचिव ॲड. विक्रम संकाये, सहसचिव अंजुमनीताई आर्य यांच्या मार्गदर्शनातून सर्व आस्थापनेत विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.
धावणे, लिंबू चमचा व थैला रेसच्या अंतिम सामन्याच्या वेळी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणि आर्य ,रमाकांत चटनाळे, मुख्याध्यापक प्रवीण भोळे, पर्यवेक्षक विजयकुमार बैले उपस्थित होते. थैला रेस या स्पर्धेमधील मोठ्या गटातून आरती शेंडगे प्रथम स्थानावर, श्वेता गिरी द्वितीय, अनुजा भंडे तृतीय क्रमांक पटकावलेला आहे.
विविध स्पर्धांच्या अमलबजावणी व यशस्वीतेसाठी राजकुमार बिरादार, रूपाली कांबळे, सुषमा सूर्यवंशी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.
