बोरगावच्या पूरग्रस्तांना रोटरीची मदत
उदगीर (प्रतिनिधी) अतिवृष्टी होऊन उदगीर तालुक्यातील बोरगाव धडकनाळ या गावातील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. बोरगाव व धडकनाळ या भागातील शेती जमिनीचे घरांची प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी उदगीर रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन मदत पोहोचविण्याचे काम केले.
उदगीर तालुक्यातील धडकनाळ व बोरगाव या दोन गावात अतिवृष्टीने थैमान घातले. या थैमानात गावातील अनेक घरांचे होत्याचे नव्हते झाले. जनजीवन विस्कळीत झाले होते. या नागरिकांना मदत करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल, संघर्ष मित्र मंडळ, श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ पत्तेवार चौक उदगीर तसेच नारायणा ऑग्रो ऑईल प्रा.ली. व श्री गोरक्षण संस्थान सोमनाथपूर उदगीरच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ धडकनाळ व बोरगाव या दोन्ही गावात भेट दिली. पहिल्या दिवशीपासूनच रोटरी क्लबने या पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्याचे काम सुरू केले. रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने बोरगाव व धडकनाळ येथील पूरग्रस्तांना पुढील आठ दिवस पुरेल इतके अन्नधान्य पुरवठा केले. या जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, भाजपचे नेते मनोज पुदाले, रोटरी क्लबचे प्रांतपाल सुधीर लातूरे, किशोर पंदिलवार, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, सचिव विक्रम हलकीकर, कम्युनिटी डायरेक्टर डॉ. दत्तात्रय पाटील, प्रोजेक्ट चेअरमन रवींद्र हसरगुंडे, राहुल मुचेवाड, विजयकुमार पारसेवार, संतोष फुलारी, मल्लिकार्जुन चिल्लरगे, रामदास जळकोटे, विशाल जैन, सागर महाजन, नारायण वाकुडे, नरेश कदम, जगदीश चौधरी, महेश गुरमे, अनिल मेंगा, नारायण तळणीकर, अभिषेक पत्तेवार, प्रशांत रंगवाळ, अक्षय कोटलवार, प्रशांत गायकवाड आदीसह संघर्ष मित्र मंडळ व श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, नारायणा ऑग्रो ऑईल प्रा.ली. व श्री गोरक्षण संस्थानचे पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.
