माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांचा ‘महाराष्ट्ररत्न पुरस्कार’ देवून लंडन येथे सन्मान

0
माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांचा 'महाराष्ट्ररत्न पुरस्कार' देवून लंडन येथे सन्मान

उदगीर (प्रतिनिधी)
माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या कार्याचा लंडनमध्ये गौरव करण्यात आला. राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा उदगीर – जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या कार्याची दखल घेऊन लोकमत समूहातर्फे ‘महाराष्ट्ररत्न पुरस्कार’ मान्यवरांच्या उपस्थितीत लंडन येथे प्रदान करण्यात आला.
आ.संजय बनसोडे यांनी, पहिल्यांदा निवडून येवुन मतदार संघाचा मागील २५ वर्षाचा बॅकलाॅग भरुन काढला.
उदगीर व जळकोट येथे प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह, मराठा भवन, लिंगायत भवन, बुध्द विहार, शादीखाना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, तिरु नदीवरील बॅरेजेस, महावितरणे कार्यालय, ग्रामीण रूग्णालये, महापुरुषांचे पुतळे, जळकोट व उदगीर शहराला राष्ट्रीय महामार्गाने जोडणारे सर्व रस्ते, विविध वाडी तांड्यावर योजना पोहचवल्या, कायमस्वरुपी पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी वाॅटरग्रीड योजना आणली. भविष्यातील बेरोजगारीचा विचार करुन उदगीर व जळकोटच्या एम.आय.डी.सी. चा प्रश्न मार्गी लावुन येथील बेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून मतदार संघातील जनतेने दुस-यांदा त्यांना ९३ हजारापेक्षा जास्त मताधिक्य देवून विजयी केले. त्याच याच कार्याची दखल घेवुन त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरण समारंभास
शुभहस्ते आणि महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा, मंत्री ना.पंकजाताई मुंडे, सिनेअभिनेते सुनिल शेट्टी, अमृता फडणवीस, लोकमत मिडीया ग्रुपचे चेअरमन डाॅ.विजय दर्डा, समुहाचे एडिटर चीफ राजेंद्र दर्डा, ज्याईंट एम.डी. ऋषी दर्डा, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मानाचा पुरस्कार आ.संजय बनसोडे यांना देण्यात आला.
माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!