अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून निर्भय मॉर्निंग वॉक रॅली व डॉ. दाभोलकरांना अभिवादन

0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून निर्भय मॉर्निंग वॉक रॅली व डॉ. दाभोलकरांना अभिवादन

उदगीर (प्रतिनिधी) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उदगीर च्या वतीने सकाळी सात वाजता बिदर रोड येथील शाहू महाराज पुतळा येथे शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिना निमित्त सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच शहीद डॉ. दाभोळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून या स्थानापासून ते बिदर रोड येथील उड्डाणपूलापर्यंत निर्भय मॉर्निंग वाक रॅली काढण्यात आली.
बिदर रोड पुला खालील बालाजी रेस्टॉरंट जवळ गुड मॉर्निंग ग्रुप व जयवंतराव पाटील मॉर्निंग वाक ग्रुप यांच्या उपस्थितीत शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन करण्यात आले. श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील यांनी प्रस्तविक केले व अभिवादन मनोगत प्रा. डॉ. बळीराम भुक्तरे,प्रा. बाबूराव माशाळकर, प्रा.शिवाजीराव सगर व सुबोध एकुरकेकर यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम गुड मॉर्निंग ग्रुप व जयवंतराव पाटील मॉर्निंग वाक ग्रुप सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. या ग्रुपच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. आभार प्रदर्शन माजी शिक्षण विस्तार अधिकारी व शाखेचे प्रधान सचिव शिरीष रोडगे यांनी केले. याप्रसंगी रमेश कोरे गुरुजी, सूर्यकांत जिरोबे,अनिल पत्तेवार, हक्कानी साहेब, मुरलीधर जाधव, रामभाऊ जाधव,बाळासाहेब चिंचोलकर , नावंदर साहेब, मलकजी साहेब, माणिक शिंदे ,काशिनाथ शिंदे, माधव फावडे, उमाकांत सौन्दळे, संजय स्वामी, भरत पस्तापुरे, सुनिल वडले, शिवकुमार वडले, झुंगास्वामी, खतगावकर इत्यादींचे सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!