जीवनात निर्भय व यशस्वी व्हायचे असेल तर वैज्ञानिक द्रष्टीकोनाचा अंगीकार करा – प्रा.गोविंद शेळके
उदगीर (प्रतिनिधी)
या जगाची प्रगती विज्ञानाने केली असुन बहुतांश लोक विज्ञानाची सृष्टी घेतात, अर्थात विज्ञानामुळे निर्माण झालेल्या सुखसुविधेचा फायदा घेतात, पण विज्ञानाची दृष्टी अर्थात विचार स्वीकारत नाहीत. जीवनात निर्भय व यशस्वी व्हायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रा. गोविंद शेळके यांनी केले.
ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिनी ‘दाभोलकर व वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर प्रमुख व्याख्या ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचार विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड. किशनराव बेडकुळे होते. तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. व्ही.पी.पवार, डॉ. चंद्रकांत उगीले, सहा.पोलिस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, उद्धव इप्पर, डॉ. अतुल खडके, महेंद्र खडागळे, ज्ञानोबा भोसले ,सुप्रिय बनसोडे, सय्यद तौफिक सरआदीची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. गोविंद शेळके म्हणाले की, इतिहासामध्ये चार्वाक पासुन ते दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी पर्यंत इतिहासामध्ये अनेक महापुरुषांची हत्या झाली. हितशत्रुनी आपल्या स्वार्थाआड येणाऱ्या सर्व महापुरुषांचा छळ केला, तर कांहीची हत्या केली. परंतू त्या नादान प्रतिगाम्यांना बंदुकीच्या गोळीने विचार मरत नसतात, तर त्यांनी सांडलेल्या एका एका थेंबामधुन अनेक वैचारीक कार्यकर्ते जन्माला येतात. महापुरुषांनी दिलेला विचार समाजामध्ये पोहचवण्याचे काम करतात. ज्ञान- विज्ञानासाठी हुतात्मा होणाऱ्या पहिल्या भारतीय हुतात्मा ठरलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा आदर्श समोर ठेवून वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार प्रचारक करेल. असे झाले तर खऱ्या अर्थाने सर्व हुतात्मा महापुरूषांना श्रद्धांजली ठरेल, असे सांगुन प्रा. शेळके पुढे म्हणाले की, देव मान्य अथवा नमान्य हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न जरी असला तरीही देवाच्या नावाने होणारे कर्मकांड, अनिष्टरूढी, परंपरा हि माणसाने विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेतली पाहीजेत. ती कसोटी म्हणजे ऐतिहासिक, वैज्ञानिक, तारकिक किंवा तर्कावर आधारीत असली पाहीजेत. थोडक्यात वैज्ञानिक दृष्टिकोन ज्या गोष्टी पुराव्याच्या कसोटीवर टिकत नाहीत ती अंधश्रद्धा, या अंधश्रद्धेमुळे पुजाऱ्या शिवाय इतर कोणाचे भले झाले नसल्याचे यावेळी प्रा.शेळके यांनी सांगीतले. कार्यक्रमास ज्ञानोबा भोसले,शेषेराव ससाने, गणेश सुर्यवंशी, आशा रोडगे, वर्षाताई शेळके, कलावती भातंबरे, अंजली वाघंबर, पुजा गायकवाड, संध्या लामतुरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा परिचय व ठळक कार्य प्रा. रत्नाकर नळेगावकर यांनी स्पष्ट केले. सुत्रसंचलन प्रा. राजेंद्र गवळे यांनी व आभार मेघराज गायकवाड मानले.
