उदयगिरीत राजीव गांधी यांची जयंती साजरी
उदगीर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. पी. बी. बळवंत यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाला प्राचार्य आर. के. मस्के, उपप्राचार्य एस. एन. हल्लाळे, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, स्टाफ सेक्रेटरी डॉ. ए. पी. मोरे, दिनविशेष समिती प्रमुख डॉ. एम. एस. खांडेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. यानिमित्ताने उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सद्भावना दिनाची शपथ देण्यात आली. यावेळी सर्वांनी जाती, धर्म, भाषा यांमध्ये कोणताही भेदभाव न ठेवता राष्ट्रीय एकात्मता, बंधुता व सौहार्द वाढवण्याची प्रतिज्ञा केली. कार्यक्रमाचा समारोप सद्भावना दिनाची शपथ घेऊन करण्यात आला.
