शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत समर्थच्या मुलींचा संघ प्रथम
उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातीचा १९ वर्षाखालील मुलींचा संघ तातुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम आला असून, हा संघ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत तालुक्याचे नेतृत्व करणार आहे.
येथील महाराष्ट्र उदयगीरी महाविद्यालयात खेळविण्यात आलेल्या तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत समर्थ च्या मुलींचा संघ प्रथम आला आहे. या संघात मृणाल नितीन पोतदार, नुपूर रामदास मलवाडे, राजनंदिनी मनोज लोया, मटके समीक्षा उमाकांत, प्रगती विनायक इंगळे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे. या यशाबद्दल खेळाडू विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांचे संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिध्दार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, रसूल पठाण, किरण हाळीघोंगडे यांच्या सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
