शिवनखेड येथे गोहत्येची घटना; विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

0
शिवनखेड येथे गोहत्येची घटना; विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर( गोविंद काळे) महाराष्ट्रात गोहत्येवर बंदी असताना आणि श्रावण मास व पोळ्यासारखे पवित्र सण तोंडावर असतानाही, अहमदपूर तालुक्यातील शिवनखेड येथे क्रूरपणे गोहत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे हिंदू संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दोषींवर राजद्रोह आणि जातीय तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, शिवनखेड येथे गोहत्या झाल्याची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना याबाबत 112 क्रमांकावर फोन करून माहिती दिली, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने वरिष्ठांना संपर्क साधून सहकार्य मागवावे लागले.
​या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने अहमदपूर पोलीस निरीक्षकांना एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात, “महाराष्ट्रात गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला असून ती हिंदू समाजात पूजनीय आहे. असे असतानाही जाणूनबुजून गोहत्या करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जर या घटनेला आळा घातला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला आहे.
​निवेदन देताना विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे जिल्हा सुरक्षा प्रमुख मधुकर धडे, हिंदू जागरण मंच विभाग प्रमुख ॲड. स्वप्निल व्हत्ते, गजानन चंदेवाड, नरेश यादव, धर्मराज केंद्रे, नारायण वगरे, बबलू ढेले, संतोष वायगावकर, शुभम वाघमोडे, नारायण हाके, सागर वाघमोडे, महेश हाले, चेतन माने, शिवाजी शिंदे, विजय माळवद, सत्यम पुढेवाड, नितीन कुमठेकर, अर्जुन ठाकूर, जीवन जमादार, वैभव सोलेकर, नंदु सोलंकर, पदमसिंह जमादार, मुसणे कृष्णा, हरी जाधव, शिवलाल सिंग ठाकरे, भरत सोलेकर, मुकुल ठाकूर, बालाजी सुरवसे, परमेश्वर सुरवसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
​या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!