नळगीर सर्कलच्या वतीने बोरगाव धडकनाळ येथे जीवनावश्यक वस्तू वाटप
उदगीर (एल पी उगीले) तालुक्यातील
मौजे बोरगाव,धडकनाळ व वागदरी येथील पुरग्रस्तांना नळगीर सर्कल मधील सरपंचांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी ॲड.ब्रम्हाजी केंद्रे सरपंच नावंदी तथा शिवसेना जिल्हाप्रमुख लातूर,दयासागर यल्लावाड सरपंच कासराळ,गोपाळ पाटील उद्योजक वागदरी,रत्नाकर बिरादार सरपंच पिंपरी,लहु कांबळे सरपंच कोदळी, राहुल कांबळे आवलकोंडा सरपंच,विठ्ठल पाटील सरपंच चोंडी, नरसिंग शिंदे मांजरी सरपंच, पांडुरंग उदगीरे वागदरी सरपंच, बालाजी परकड धडकनाळ सरपंच, अनिता सुकानंद बोईनवाड सरपंच टाकळी,सचिन पाटील उपसरपंच मांजरी, शिवाजी पाटील वागदरी इत्यादी प्रमुख मंडळी उपस्थित होते.
