कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0
कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) येथील कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात एक पेड माॅं के नाम या मोहिमे अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालय व महाविद्यालय परिसरामध्ये विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले . संस्थेचे सचिव डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी एक पेड मा के नाम या मोहिमेंतर्गत भाग घेऊन प्राध्यापकांनी वृक्ष लागवड केली. या कार्यक्रमाचे आयोजन हिंदी विभागातील प्रा. डॉ. साळुंके एस बी यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!