रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या शहर अध्यक्षपदी सुधीर घोरपडे यांची निवड
उदगीर (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षा ची उदगीर येथील शासकीय रेस्ट हाऊस येथे रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा सरचिटणीस देवीदासजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्यकरणीची निवड करण्यात आली. यावेळी शहर अध्यक्षपदी सुधीर घोरपडे यांची तर अतुल घोडके यांची उदगीर तालुका प्रवक्तेपदी, शहर उपाध्यक्षपदी मकबूल शेख यांची व ऑटो युनियन शहर संघटक पदी शंकर वाघमारे यांची निवड करूननियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी उदगीर तालुकाध्यक्ष ॲड. प्रफुल्लकुमार उदगीरकर , युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. याप्रसंगी महेंद्रकर ऑप्टिकल चे मालक अक्षय महिंद्रकर हेही उपस्थित होते. अतुल घोडके , नितीन गायकवाड ,नरेश चांदे,राजकुमार माणसे,गुंडू शिंदे,आदित्य घोरपडे, इम्रान खान, कृष्णा चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थिती होते.
