ग्रामीण विभागातून ‘नाईक चौकाचा राजा गणपती’ला प्रथम पारितोषिक

0
ग्रामीण विभागातून ‘नाईक चौकाचा राजा गणपती’ला प्रथम पारितोषिक

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर तालुक्यातील ग्रामीण विभागातून स्वामी विवेकानंद विघ्नहर्ता चॅरिटेबल ट्रस्ट गणेश मंडळ, नाईक चौकाचा राजा गणपती यांनी यावर्षी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. शांतता कमिटी आयोजित पारितोषिक वितरण सोहळा रघुकुल मंगल कार्यालय, उदगीर येथे पार पडला.
या सोहळ्यात जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे साहेब,माजी आ.गोविंद अण्णा केंद्रे, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष गुलाब अण्णा पटवारी, उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, तहसीलदार राम बोरगावकर, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुजारी, नगरसेवक गणेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पारितोषिक स्वीकारताना ट्रस्टचे अध्यक्ष उदयसिंह ठाकूर, सचिव अजित राठोड, सहसचिव राहुल सातापुरे, माजी अध्यक्ष विनीत पाटील, खजिनदार शैलेश कोंडेकर, माजी अध्यक्ष विकास जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात तसेच वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून मंडळाने लोकमानसात वेगळी छाप पाडली आहे. मंडळाच्या यशामध्ये अहोरात्र मेहनत करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!