चलो मुंबईच्या पूर्वसंध्येलाच अहमदपूरमध्ये मराठा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न​

0
चलो मुंबईच्या पूर्वसंध्येलाच अहमदपूरमध्ये मराठा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न​

पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर( गोविंद काळे ) मनोज जरांगे-पाटील यांनी ‘चलो मुंबई’चा नारा दिल्यानंतर मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील समाज मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत असतानाच, अहमदपूर तालुक्यातील सिंदगी बुद्रुक गावात एका ३५ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत त्याने हे पाऊल उचलले. सध्या त्याच्यावर लातूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बळीराम मुळे (वय ३५) असे या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याने, मराठा समाजात सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच निराशेपोटी बळीराम मुळे यांनी खिशात एक चिठ्ठी लिहून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. या चिठ्ठीत त्याने मराठा आरक्षणासाठी मी आत्महत्या करत आहे माफ करा सकल मराठा समाज जरांगे पाटील असे लिहले आहे हे सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जाणून बुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप देखील युवकाने केला असल्याचे सांगण्यात येत आहे .

​या घटनेमुळे ‘चलो मुंबई’ आंदोलनाच्या पूर्वसंध्येलाच मराठा समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता पसरली आहे. तरुणाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी, या घटनेने आरक्षणाच्या मुद्द्याचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!