सुनेगाव (शें.) येथे शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

0
सुनेगाव (शें.) येथे शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

​अहमदपूर ( गोविंद काळे ) महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग अंतर्गत, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत सुनेगाव (शें.) येथे शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. अन्न व पोषण सुरक्षा (कडधान्य) सन २०२५-२६ च्या पिक पद्धतीवर आधारित हे प्रशिक्षण विशेषतः ‘माऊली शेतकरी गटा’साठी आयोजित करण्यात आले होते.

​ या प्रशिक्षण कार्यक्रमात यंदाच्या खरीप हंगामात पिक प्रात्यक्षिकासाठी निवड झालेल्या ‘माऊली शेतकरी गटा’चे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी तूर पिकाच्या लागवड तंत्रज्ञानापासून ते खत व्यवस्थापन आणि शेंडा खुडणी पद्धती यावर सखोल मार्गदर्शन केले

   याच बरोबर, सहायक कृषी अधिकारी विष्णू कलमे यांनी तूर पिकातील प्रमुख किडी, मर रोग आणि त्यांच्या जैविक तसेच रासायनिक नियंत्रणाबद्दल माहिती दिली. सुनेगाव (शें.) चे सहायक कृषी अधिकारी हणमंत टोकले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर शेतकरी लखन जायभाये यांनी उपस्थितांचे आभार मानले.

​ या प्रशिक्षण कार्यक्रमात ‘माऊली शेतकरी गटा’चे अध्यक्ष गोपाळ काळे, उपाध्यक्ष राम थगनर, कोषाध्यक्ष प्रभाकर जायभाये यांच्यासह राम जायभाये, सखाराम जायभाये, शुभम जायभाये, शिवाजी काळे, राजू जायभाये, माधव काटे, संभाजी थगनर, रामेश्वर जायभाये, माधव जायभाये, गुंडीबा जायभाये, किशन काटे, श्रीराम थगनर आदी शेतकरी उपस्थित होते. महिला शेतकरी सदस्यांमध्ये मुद्रिका जायभाये, पार्वती जायभाये, भारतबाई काटे, अरुणा जाधव, मीरा जायभाये, प्रेमलाबाई जायभाये, सिंधू जायभाये यांनीही सहभाग घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!