उदगीर तालुक्यात काँग्रेसचा तिरंगा फडकणार – कल्याण पाटील

0
उदगीर तालुक्यात काँग्रेसचा तिरंगा फडकणार – कल्याण पाटील

नांदेड (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच माजी मंत्री व लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर, हिंगोली व नांदेड जिल्ह्याची आढावा बैठक स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पार पडली.
या बैठकीत उदगीर तालुक्याचा आढावा तालुकाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त सचिव कल्याण पाटील यांनी सविस्तर मांडला.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की,
“उदगीर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते आ. अमित देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली अतिशय उत्कृष्ट कार्य करीत आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी प्रशासनाकडे नेहमीच पाठपुरावा केला जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्त उर्जा आहे. नगरपालिका निवडणूक असो वा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असोत, जनतेचा आशीर्वाद निश्चितपणे काँग्रेससोबत असेल, अमित देशमुख यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा तिरंगा फडकविण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते सज्ज आहोत.”तसेच त्यांनी पुढे सांगितले की,“तरुणांची एक नवी फळी उभारण्याचे काम गेल्या वर्षभरा पासून सुरु आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतील मानधनापासून वंचित युवकांच्या समस्या, तसेच तालुक्यातील ढगफुटीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने वाढलेली नळपट्टी, वाहतूक कोंडी यासारख्या शहरातील समस्यांवरही सातत्याने पाठपुरावा होत आहे. जनतेपर्यंत पोहोचून, त्यांच्या मनातील जाहीरनामा तयार करून आणि सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने काँग्रेस आगामी निवडणुका जिंकणार यात मला शंका नाही.” असेही विचार कल्याण पाटील यांनी व्यक्त केले.
या बैठकीस लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!