लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा व स्पर्धा संपन्न.

0
लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा व स्पर्धा संपन्न.

उदगीर…. येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त कलोपासक मंडळ प्रमुख सौ.सोनिया देशपांडे यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवणे कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन केले होते.
या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ.अर्चना सुवर्णकार,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक सौ.अर्चना सुवर्णकार यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे महत्व सांगितले.प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत.पाण्यातील जीवांना त्याचा त्रास होतो व पाणी दुषित होते.ईको फ्रेंडली गणेश मूर्तीमुळे पर्यावरणाचे रक्षण होते.त्यासाठी सर्वांनी आपल्या घरी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच स्थापना करावी,असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-बाबांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणण्याचे व गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले.
‌‌ सौ.सोनिया देशपांडेबाई व सुवर्णकारबाईंनी गणेशमूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.या कार्यशाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण ८९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.कार्यशाळेत उत्कृष्ट गणेशमूर्ती बनवलेल्या विद्यार्थ्यांचे इयत्तानिहाय प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले.
इयत्ता पहिली वर्गातून प्रथम -प्रियांका सुरेश पवार,द्वितीय -दिशा अनिल चव्हाण,तृतीय-शौर्य संतोष भूताळे व उत्तेजनार्थ -हर्षदा भागवत तलवारे.इयत्ता दुसरी वर्गातून प्रथम -स्वरा व्यंकट भोईनवाड, द्वितीय -विराज विवेक पवार, तृतीय -स्वरा शिवरत्न शेल्हाळकर व उत्तेजनार्थ -चैतन्य अतुल गुरमे.इयत्ता तिसरी वर्गातून प्रथम -सान्वी योगेश वट्टमवार, द्वितीय -श्रीमयी गणेश आग्रे, तृतीय-प्रभास साहेबराव भोईनवाड व उत्तेजनार्थ -ओवी बाळाराम बानापुरे तसेच, इयत्ता चौथी वर्गातून प्रथम -हर्ष हणमंत फड, द्वितीय -आराध्या संदिप अनंतवाळ, तृतीय -आदिश्री संतोष बिरादार व उत्तेजनार्थ -काव्या गिरीषनंद हिप्पळगावकर इत्यादी विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले.
सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.कार्यशाळा व स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!