जिव्हाळा ग्रुप तर्फे डॉ नंदकुमार गायकवाड यांचा सेवानिवृत्ती बद्दल हृद्य सत्कार

0
जिव्हाळा ग्रुप तर्फे डॉ नंदकुमार गायकवाड यांचा सेवानिवृत्ती बद्दल हृद्य सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर येथील पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ नंदकुमार गायकवाड यांचा जिव्हाळा ग्रुप तर्फे ज्येष्ठ सदस्य सोपानराव माने गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. अनिल भिकाने, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मूडपे, जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष दशरथ शिंदे इत्यादींच्या उपस्थितीत संपन्न झाला. विठ्ठलराव फुलसे यांनी आपल्या मधुर आवाजात भक्ती गीत सादर केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सत्काराला उत्तर देताना डॉ. नंदकुमार गायकवाड म्हणाले, महाविद्यालयात शिस्त, सहनशक्ती व स्नेहाच्या त्रिसुत्रीमुळे मी विद्यार्थिनीष्ठ राहून विद्यार्थ्यांच्या मनात प्रेमाचे व आदराचे स्थान निर्माण करू शकलो.
डॉ अनिल भिकाने यांनीही डॉ गायकवाड यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. जागतिक श्वान दिनाच्या निमित्ताने डॉ भिकाने म्हणाले श्वान हा वृद्धापकाळी ज्येष्ठांचा स्वामिनीष्ठ आधार असून लहान मुलांचा निर्मळ मनाचा दोस्त आहे. पोलीस खात्यामध्ये गुन्हेगार शोधण्याचे कार्य सुद्धा श्वान करतात, असे डॉ भिकाने म्हणाले. विश्वनाथ मुडपे व चंद्रकांत पांचाळ यांनीही डॉ गायकवाड यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
तत्पूर्वी विश्वनाथराव माळेवाडीकर, अशोकराव बिरादार व दिलीप कंधारे यांनी शाल श्रीफळ, पुष्पहारासह सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ भेट देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष दशरथ शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बिडवई यांनी केले तर चंद्रकांत रोडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास देविदासराव नादरगे, नवनाथ पाटील,मोहनराव खिन्डीवाले, अमृतराव देशपांडे, हावगीराव आचार्य, लहुजी याचावाड, शरणाप्पा खेळगे, चंद्रकात पांचाळ इत्यादीं उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!