तात्काळ पंचनामे करून ग्रामस्थांना मदत करण्याच्या प्रशासनास आमदार संजय बनसोडे यांचे सूचना

0
तात्काळ पंचनामे करून ग्रामस्थांना मदत करण्याच्या प्रशासनास आमदार संजय बनसोडे यांचे सूचना

उदगीर /लक्ष्मण उगीले : तालुक्यात पुन्हा अतिवृष्टीमुळे धडकनाळ व बोरगाव या गावात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. यामध्ये पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे गावात पाणी शिरुन गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची बातमी माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांना समजताच, त्यांनी धडकनाळ व बोरगाव या गावांना भेट देवुन पाहणी केली, व तात्काळ पंचनामे करून ग्रामस्थांना मदत करण्याच्या सुचना आ. संजय बनसोडे यांनी प्रशासनास दिल्या. ग्रामस्थांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मागील आठवड्यात ही अशीच पुरग्रस्त परिस्थिती उद्भवुन गावाशेजारील जनावरांचे शेड व त्यामधील शेकडो शेळ्या व जनावरे वाहून गेली आहेत. विद्युत प्रवाहाचा डी.पी. व वाहने वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यावेळी आपण प्रशासनास सुचना देवून मदत कार्य चालु ठेवले होते. त्यावेळीही पंचनामे करण्यात आले होते. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने यावर आपण लवकरच तोडगा काढणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, कार्यकारी अभियंता रवींद्र महाव्दार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अलका डाके, जलसंधारणचे रणजित नाईक, माजी जि.प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, श्याम डावळे, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटोदे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर, ज्ञानेश्वर पाटील रावणगाव, आदीसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी घरे, शेती, गोठे, जनावरे, विहीरी, पाईपलाईन आदीसह नुकसान झालेल्या भागाची पाहणी करुन पंचनामे करण्याच्या सुचना आ.संजय बनसोडे यांनी दिल्या. त्यासोबतच गावाचे पुनर्वसण करण्यासाठीच्या उपाय योजना. नदी व नाला रुंदीकरण, सरळीकरण, खोलीकरण करण्यासाठी संबंधित विभागाला सुचना देवून परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन आ.बनसोडे यांनी दिले.
यावेळी धडकनाळ, बोरगाव, वागदरी गावातील पुरग्रस्त परिस्थिचा आढावा अधिकाऱ्यासमवेत आ.संजय बनसोडे यांनी घेवुन मदत, उपाययोजना व पंचनाम्या संदर्भात येत्या ३ दिवसात अहवाल देण्याच्या सुचना दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!