युवा सामाजिक कार्यकर्ते इम्रोज सलीम पटवेगर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

0
युवा सामाजिक कार्यकर्ते इम्रोज सलीम पटवेगर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

​अहमदपूर( प्रतिनिधी ) युवा सामाजिक कार्यकर्ते इम्रोज सलीम पटवेगर यांनी दि २६ ऑगष्ट रोजी लातूर, नांदेड, आणि हिंगोली जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नांदेड येथील नक्षत्र बँक्वेंट हॉलमध्ये आयोजित या बैठकीत कॉग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

​यावेळी बोलताना इम्रोज पटवेगर यांनी, “मी सोनिया गांधी, राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे सांगितले. अहमदपूर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आणि धर्मनिरपेक्ष विचारांना बळकटी देण्यासाठी आपण काम करू, असेही ते म्हणाले.

​ते पुढे म्हणाले, की,”मी पक्षाला विश्वास देतो की, आम्ही सर्वजण मिळून काँग्रेसला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणू आणि लातूर जिल्ह्याला काँग्रेसचा बालेकिल्ला बनवू.”

​याप्रसंगी काँग्रेस नेते कुणाल चौधरी, खासदार डॉ. शिवाजी काळगे, खा. डॉ. कल्याण काळे, रवींद्र चव्हाण, प्रदेश नेते एन. आर .पाटील, श्री शैल्य उडगे, जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. हेमंत पाटील, ज्योती पवार, क्षीरसागर, चंद्रकांत मद्धे, विकास महाजन, सिराजुद्दीन जागीरदार, प्रकाश ससाने, जिलानी मणियार, इरफान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!