शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांनी घेतली पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांनी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन लातूर जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी कामगार बांधवांच्या व जनतेच्या मूलभूत गरजा व रस्ते,वीज पाणी पुरवठा याबाबत सविस्तर चर्चा करून विकास कामाबाबत माहिती दिली. लातुर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विकास कामांसाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी रेड्डी यांना दिले. यावेळी अहमदपूर शहर प्रमुख तथा बाजार समितीचे संचालक भारत सांगवीकर, पत्रकार बालाजी काळे, उपस्थित होते.