श्यामार्य कन्या विद्यालयात नवभारत साक्षरता अभियानांतर्गत साक्षरता जनजागृतीसाठी पथनाट्य व रॅलीचे आयोजन करण्यात आले.
उदगीर (प्रतिनिधी), श्यामार्य कन्या विद्यालयात नवभारत साक्षरता अभियानांतर्गत पथनाट्य व रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी शेख, श्यामार्य कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण भोळे, पर्यवेक्षक विजय बैले सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
श्यामार्य कन्या विद्यालयातील वर्ग पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांद्वारे जनजागृती अंतर्गत नवभारत साक्षरता अभियानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. गट शिक्षणाधिकारी शेख यांच्या वतीने या पथनाट्यास बक्षीस प्रदान करण्यात आले.
भारतात, साक्षरता अभियानाचा मुख्य कार्यक्रम हा नवभारत साक्षरता कार्यक्रम आहे, जो केंद्र शासनाने सुरु केला आहे. या कार्यक्रमाद्वारे 15 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या निरक्षर व्यक्तींना मूलभूत साक्षरता, संख्याज्ञान आणि डिजिटल साक्षरता देऊन त्यांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून 2030 पर्यंत संपूर्ण भारतात 100% साक्षरता गाठता येईल, असे मनोगतातून गटशिक्षणाधिकारी शेख यांनी माहिती दिली.
सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा”, “एकाने एकास शिकवावे, निरक्षरता दूर करावी”, “जो राहे निरक्षर, तो फसे निरंतर” आणि “साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा” अशा काही प्रमुख घोषवाक्याद्वारे रॅली मधील सर्व विद्यार्थ्यांनी जनजागृती केली,आणि साक्षरतेचे महत्व पटवून दिले.
