जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते निसर्गरम्य हत्तीबेटावर वृक्षारोपणनिसर्गरम्य स्थळाला मिळाले नवचैतन्य

0
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते निसर्गरम्य हत्तीबेटावर वृक्षारोपणनिसर्गरम्य स्थळाला मिळाले नवचैतन्य

उदगीर (प्रतिनिधी) प्रसिद्ध निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जाणारा हत्तीबेट परिसर निसर्गसंपदेने नटलेला आहे. या परिसराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उदगीर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, सरपंच अभिजित साकोळकर ,उपसरपंच वैजनाथ वाडकर,सुधाकर बिरादार, अहमदपूर रोटरी क्लब चे अध्यक्ष कपील बिरादार , गंगाधर गरीबे ,युवराज धोतरे, विठ्ठल कुलकर्णी यांची उपस्थिती होती. निसर्गाच्या सानिध्यात मन:शांती मिळावी, पर्यावरण संवर्धनाचा संदेश सर्वत्र जावा, आणि भावी पिढ्यांना हिरवागार वारसा लाभावा. या उद्देशाने हा वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला.
पर्यटकांसाठी हत्तीबेट केवळ एक फिरण्यासाठीचे ठिकाण नसून, निसर्गाशी नाते घट्ट करणारी एक अद्भुत अनुभूती ठरते. हिरवीगार झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पावसाळ्यात उमलणारे रानफुले या परिसराला स्वर्गीय रुप बहाल करतात. पोलिस अधीक्षक अमोल तांबे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या उपस्थितीत झालेल्या वृक्षारोपणामुळे हत्तीबेट पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अधिकच समृद्ध होवून, या परिसराची लोकप्रियता निश्चितच वाढणार आहे. या कार्यक्रमासाठी हत्तीबेट पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष व्ही. एस. कुलकर्णी, उपाध्यक्ष ज्योती बानापुरे, सचिन सूर्यवंशी, विष्णू संपते, गणेश चव्हाण, संदीप सूर्यवंशी, बाबुराव राठोड, राम बतले यांनी पुढाकार घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!