छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात आरोग्य विषयक कार्यक्रम संपन्न

0
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात आरोग्य विषयक कार्यक्रम संपन्न

उदगीर (एल पी उगीले)छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दंत व मूखरोग तज्ज्ञ, डॉ.स्मिता वंजे डॉ. शशीकांत महालिंग यांची होती.
यावेळी डॉ.स्मिता वंजे यांनी दाताची काळजी कशी घ्यावी? याबद्दल मार्गदर्शन करताना म्हटले,लहान मुले व म्हातारे व्यक्ती यांना दातांच्या खूप समस्या निर्माण होत असतात. वेळीच सावधगिरी बाळगली तर ते त्रासापासून दूर होऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या.तर शशीकांत महालिंग यांनी एचआयव्ही या विषयी व आरोग्याच्या काळजी घेण्यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.ए.सी. आकडे यांनी तर,सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ.व्हि.के.भालेराव तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ.एच.एम.ढगे यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!