अनैतिक संबंधातून तरुणाचा खून दोन आरोपी अटक

0
अनैतिक संबंधातून तरुणाचा खून दोन आरोपी अटक

उदगीर (एल पी उगीले)तालुक्यातील मौजे नेत्रगाव शिवारात एका 45 वर्ष वयाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. यासंदर्भात उदगीर ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. पिंटू उर्फ महादेव कोंडीबा गायकवाड (वय 45 वर्ष रा. डोंगरगाव तालुका शिरूर आनंदपाल हाल मुक्काम समता नगर, उदगीर) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नेत्रगाव ते उदगीर जाणाऱ्या रोडवर समता नगर जवळ पश्चिमेला आढळून आला. आरोपींनी संगणमत करून अनैतिक संबंधातून उद्भवलेल्या कारणावरून महादेव गायकवाड यांच्या डोक्यात व छातीत जबर मारहाण करून त्याचा खून केल्याची चर्चा आहे. त्यानंतर त्याचे प्रेत नेत्रगाव शिवारातील रस्त्यावर फेकून दिले. अशा पद्धतीची फिर्याद मृताचा भाऊ हनुमंत कोंडीबा गायकवाड (वय 69 वर्ष रा. डोंगरगाव तालुका शिरूर अनंतपाळ) यांनी दिल्यावरून संशयित आरोपी सुनीता मधुकर पोरखे (रा. समता नगर उदगीर) आणि अंबादास प्रकाश बिरादार (रा. येनकी तालुका उदगीर) या दोघांवर उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकते हे करत आहेत. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले असून पुरावे गोळा केले जात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!