महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ. वर्गीस कुरियन यांना अभिवादन

0
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ. वर्गीस कुरियन यांना अभिवादन

उदगीर (एल पी उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डेअरी सायन्स विभागाच्या वतीने ‘श्वेतक्रांतीचे जनक’ डॉ. वर्गीस कुरियन यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कुरियन यांच्या कार्याची उपयुक्तता, भारतातील दुग्धोत्पादन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे महत्त्व आणि ग्रामीण विकासाशी त्यांचा असलेला संबंध यावर सविस्तर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. भालचंद्र करंडे यांनी अमेरिकेतील आपल्या संशोधन अनुभवाचा उल्लेख करताना सांगितले की डॉ. कुरियन यांच्या दूरदृष्टीमुळेच भारताची डेअरी उद्योगक्षेत्रात जगभरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे, तसेच शेतकरी आणि देशातील सामान्य माणसाचे जीवनमान उंचावले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. एस. एन. लांडगे यांनी केले आणि विद्यार्थ्यांना या दिनानिमित्त डॉ. कुरियन यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कोमल पवार हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी राठोड हिने मानले. याप्रसंगी विभागातील प्राध्यापक डॉ. अमोल होनकर, डॉ. जयराज तोंडारे, प्रा. एस. एम. गायकवाड, प्रा. विशाल रंगवाळ, प्रा. शैलेश ममदापूरे आदींसह प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!