विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेत उदयगिरीच्या खेळाडूंना घवघवीत यश

0
विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेत उदयगिरीच्या खेळाडूंना घवघवीत यश

लोकनेता न्यूज नेटवर्क
उदगीर (एल पी उगीले): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर विभागीय टेबल टेनिस (पुरुष महिला) स्पर्धा दिनांक 11 सप्टेंबर 2025 ऑगस्ट रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी ‘ब’ विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेत महिला खेळाडू्ंनी विद्यापीठातून सर्व द्वितीय क्रमांक (उपविजेतेपद) पटकाविला आहे. तर पुरुष खेळाडूंनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. विजेत्या संघामध्ये ऋतुजा सूर्यवंशी, आदिती कुंडगीर, श्रद्धा सूर्यवंशी, जडीतकर पल्लवी तर पुरुष संघांमध्ये सुरज तवर, स्वप्निल कुमठेकर, विष्णू राठोड या खेळाडूंचा समावेश होता. या विजयी खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे, प्रा. रमजू शेख यांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल विजयी सर्व खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, प्राचार्य, उपप्राचार्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!