सर्व रोगनिदान व वृक्षारोपणाचे कार्यक्रम  राज्यमंत्री संजय भाऊ बनसोडे यांच्या हस्ते संपन्न

सर्व रोगनिदान व वृक्षारोपणाचे कार्यक्रम  राज्यमंत्री संजय भाऊ बनसोडे यांच्या हस्ते संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : ऑल इंडिया मेडिकल लँबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन उदगीर ,अभिजीत अशोकराव औटे मित्र मंडळ, उदयगिरी लाँयन्स नेत्र रुग्णालय, मधुर डायबेटीज सुपर स्पेशालिटी सेंटर, श्रीसाई हाँस्पिटल, लाँयन्स क्लब सनरायजर्स यांच्या सयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी, कान ,नाक,घसा ,दंत, सर्व रोग निदान, मधुमेह, रक्तदाब तपासणी शिबिर व प्रत्येक घरी वृक्षारोपण  लागवड अभियानाचे राज्य मंत्री संजयभाऊ बनसोडे यांच्या हस्ते  उदघाटन संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक शाळा, तिरुपती सोसायटी उदगीर येथे  झाले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती शिवाजी मुळे, उदयगीरी लाँयन्स नेत्र रुग्णालय अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया ,राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर अध्यक्षा दिपाली औटे, डॉ.किनीकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष समिर शेख, माजी नगरसेवक विजय चवळे,तर प्रमुख उपस्थितीत  मुख्याध्यापिका अनिता जगताप, राम बेल्लाळे, राम जाधव, जनकराज जिवने, नामदेव बिरादार, अनिल पत्तेवार, काशिनाथ पांढरे, सुभाषचंद्र बेद्रे, सुर्यंकांत मिरजगावे,ज्ञानेश्वर  इंद्राळे, गुरुबस बारुळे, लक्ष्मण कुलबर्गे, गणपत नखाते हे होते. या कार्यक्रमाचे आयोजक मित्र मंडळ अध्यक्ष अभिजीत औटे, आॅल इंडिया मेडिकल लँबोरेटरी टेक्नॉलॉजी असोसिएशन चे अध्यक्ष बळवंत चिंचोलकर, लायन्स क्लब उदगीर सनरायजर्सचे अध्यक्ष योगेश चिद्रेवार, मधुर डायबेटीज सेंटर चे डॉ. प्रशांत नवटक्के, कवठाळे हॉस्पिटल चे डॉ.विजय कवठाळे,  निखिलेश्वर क्लिनिक चे डाँ. व्यंकटेश वटटमवार, श्री साई होस्पिटल चे डॉ. मनोहर सुर्यवंशी व सचिव संदिप अवलगोंडे, संघटक संदिप कोयले, उपाध्यक्ष संतोष कुलकर्णी ,शोएब शेख, सहसचिव सिधेश्वर शेटकार, कोषाध्यक्ष सचिन पुरी, सल्लागार अनिल बिरादार, ओम बोळेगावे, गणेश बिरादार, सुनील अपसिंगेकर, दत्ता सूर्यवंशी, शिवराज कुमठेकर, रईसा शेख, अजय भांतांब्रे,मित्र मंडळ कोषाध्यक्ष विनोद पदमगिरवार, मराठवाडा अध्यक्ष अंगद मुळे, मराठवाडा सचिव रतिकांत घोगरे, मराठवाडा उपाध्यक्ष राजु सोमवंशी ,जिल्हा अध्यक्ष शेख मोहम्मद, महिला शहर जिल्हा अध्यक्षा चंचला हुगे, महिला तालूका अध्यक्ष अनिता काकरे, युवती अध्यक्षा सविता जाधव, शहर अध्यक्ष सय्यद सलिम, महिला शहर अध्यक्षा ज्योती खतगावे,युवती जिल्हा अध्यक्षा मोनिका डोंगरे,जिल्हा संपर्क प्रमुख गणपत वाघमारे, महिला जिल्हा सचिव कविता राठोड, तालुका अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, तालुका उपाध्यक्ष निलावती गायकवाड, डॉ.संदिप सोंटक्के, सुमित वाकुडे,अविनाश शिंदे, संतोष बिरादार, गजानन मिरजगावे, विजय चिखले, संतोष बिरादार, शेख मोबिन दत्तात्रय काळोजी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुका कार्यअध्यक्ष प्रदिप जोधळे, शहर अध्यक्ष प्रेम तोगरे, महिला जिल्हा सरचिटणीस हुसना शेख  यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

About The Author

error: Content is protected !!