श्री केशवराज विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी वसमतकर

श्री केशवराज विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी वसमतकर

लातूर (प्रतिनिधी) : येथील श्री केशवराज विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सुनील वसमतकर व उपमुख्याध्यापक म्हणून बालासाहेब केंद्रे हे रुजू झाले आहेत. श्री केशवराज विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे संजय विभुते यांची संस्थेच्या आदेशानुसार बीड येथील स्वा. सावरकर माध्यमिक विद्यालयात बदली झाली आहे.या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर वसमतकर हे रुजू झाले आहेत. सुनील वसमतकर यांनी केशवराज विद्यालयात यापूर्वी सहशिक्षक, पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक म्हणून काम केलेले आहे. मुख्याध्यापक सुनील वसमतकर व उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शालेय समितीचे अध्यक्ष आनंदराज देशपांडे, धनंजय कुलकर्णी, प्रदीप राऊत यांनी पुष्पगुच्छ देवून वसमतकर व केंद्रे यांचे स्वागत केले. या नियुक्तीबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह चंद्रकांत मुळे, विद्यासभेचे अध्यक्ष किरणराव भावठाणकर, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष रावसाहेब देशपांडे, कार्यवाह जितेश चापसी, शालेय समितीचे अध्यक्ष आनंदराज देशपांडे, रेनिसन्स शालेय समितीचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी तुंगीकर, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष प्रदीप राऊत यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author