प्रमुख जिल्हान्यायाधिशाची उदगीर न्यायालयास भेट!

प्रमुख जिल्हान्यायाधिशाची उदगीर न्यायालयास भेट!

उदगीर (प्रतिनिधी) : येथील जिल्हा सत्र न्यायालयास लातूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख न्यायाधिश मंगला थोटे मॅडम यांनी भेट दिली. मुख्यतः प्रशासकीय कामानिमित्त आलेले लातूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हान्यायाधिश मंगला थोटे ह्या उदगीर येथे प्रशासकीय कामानिमित्त आले होते. त्यामुळे उदगीर तालुका विधिज्ञ संघाच्या विनंतीवरुन त्यांनी न्यायालयास भेट दिली. यावेळी कोर्ट मॅनेजर हारिश भुईटे, उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे मान्यवर न्यायाधिश नाजीम मनेर, मान्यवर न्यायधिश योगेश मनाडकर, मान्यवर न्यायाधिश पी. डी. सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी न्यायालयाच्या सभागृहाचे कामकाज या वर चर्चा करण्यात आली. तसेच येथील नव्याने कारागृहास मंजुरी मिळावी विधीज्ञ संघाच्य सभागृहाची आसलेली जागा अपुरी आसल्याने त्याची पुर्ननिर्मिती व्हावी यासाठी बाधकामासंदर्भात मागणी करण्यात आली .सदरील या मागणी वरून लवकरच निर्णय घेऊ असेही प्रमुख जिल्हान्यायाधि यांनी सांगितले. यावेळी विधिज्ञ संघाचे आध्यक्ष ॲड. बालाजी पाटील, उपाध्यक्ष ॲड. बालासाहेब नवटक्के सचिव ॲड. भास्कर बोळे, महिला प्रतिनिधी ॲड. पुनम टाकळे आदी जेष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड भास्कर बोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड बालाजी पाटील यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!