वंचित बहुजन आघाडीत आम आदमी पार्टीच्या मनोहरराव पाटील यांचा जाहीर प्रवेश

वंचित बहुजन आघाडीत आम आदमी पार्टीच्या मनोहरराव पाटील यांचा जाहीर प्रवेश

अहमदपूर (गोविंद काळे) : वंचित बहुजन आघाडीचे अहमदपुर तालुक्याचे अध्यक्ष सहदेव होनाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात आम आदमी पार्टी चे मनोहरराव पाटील साहेब यांचा जाहीर प्रवेश जिल्हाध्यक्ष जगदीश माळी व महासचिव डॉ तात्याराव वाघमारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.मनोहरराव पाटील हे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असुन ते यापुर्वी आम आदमी पक्षाचे नेते होते.सध्या महाराष्ट्रात सर्वच पक्ष सत्तेवर आले आहेत भाजपा केंद्रात तर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस राज्यात ,म्हणून हे एकमेकांना सोईस्कर राजकारण करत आहेत.त्यामुळे राज्यात विरोधी पक्षाची भूमिका वंचित बहुजन आघाडी पार पाडत आह. ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनोहर पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. प्रवेशाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रिकांतभाऊ बनसोडे, सुप्रियभाऊ बनसोडे, अयोध्याताई केंद्रे, मारोती वाघमारे, उत्तम गोरे,सारिपुत्र ढवळे, संतोष गायकवाड, भिमराव कांबळे, उत्तम लोखंडे, मंगेश स्वामी, चंद्र प्रकाश घोटे, गौतम कांबळे, मिलिंद कांबळे, सय्यद तबरेज,धिरज कांबळे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विनयकुमार ढवळे यांनी तर आभार प्रदर्शन वंचित आघाडी चे प्रवक्ते बाबासाहेब वाघमारे यांनी मानले.

About The Author